लांजा : लांजा-आसगे-तळवडे मार्गावरील आडवली रेल्वे ब्रिज येथे गुरुवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता डंपरचे पुढील जॉईंट तुटल्याने डंपर पलटी होऊन अपघात झाला. या घटनेनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू पसरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (एमएच-13 ए एक्स 1300) डंपर वाळू घेऊन जात असताना हा अपघात घडला. पुढील जॉईंट अचानक तुटल्यामुळे डंपर रस्त्याच्या कडेला उलटला. त्यामुळे रस्त्यावर वाळू सांडून वाहतूक अडथळीत झाली. अपघातात डंपर चालक जखमी झाला असून त्याला लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त डंपर बाजूला करून काही वेळातच रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
लांजा : आडवली रेल्वे ब्रिजखाली डंपरचे जॉईंट तुटल्याने अपघात; वाहतूक ठप्प
