दापोली : दापोलीत एका विशिष्ट समाजासंदर्भात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी व्यावसाईक शैलेश मोरे याचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित शैलेश मोरे यांनी त्यांच्या फेसबुक या समाज माध्यमावर ब्राह्मण समाजाच्या संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती त्याची माहिती मुरुड येथील विराज खोत या युवकाला समजली. 27 जून रोजी सायंकाळी याची माहिती मिळताच त्याने दापोली येथील समाजातील पदाधिकारी यांना माहिती दिल्यावर मोरे यांचे विरोधात तक्रार करण्यासाठी त्या समाजातील लोक युवकांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मोरे याचे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. 28 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित शैलेश मोरे यांचेविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 196 (1),(अ) व 299 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.
दापोलीत विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रकरणी व्यावसायिकाला अटक

Leave a Comment