चिपळूण (प्रतिनिधी) : भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस पदी चिपळूण येथील सौ प्रणाली अविनाश सावर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल प्रणाली यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रणाली सावर्डेकर गेले काही वर्षात भाजपा कार्यरत असून पक्षाने त्यांच्यावर यापूर्वी अनुसूचित जाती शहर उपाध्यक्ष, त्यानंतर चिपळूण शहर चिटणीस या पदांची जबाबदारी सोपवली होती. आता भाजपा पक्षाने प्रणाली सावर्डेकर यांच्यावर जिल्हा सरचिटणीस दक्षिण रत्नागिरी या पदाची जबाबदारी सोपवली आहे.
याबाबत प्रणाली यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भाजपा पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री तथा भाजपा रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री ना. नितेश राणे, खासदार नारायण राणे तसेच दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
तसेच अनुसूचित जातीची महिला म्हणून मला या पदाची संधी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीची खूप आभारी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची योग्य ती दखल घेतली जाते हे आज सिद्ध झाले. जिल्हा पातळीवर काम करताना मी पक्षाची ध्येय धोरणे सांभाळून निश्चितपणाने काम करेल आपण मला दिलेले पद हा माझा बहुमान नसून पार्टीच्या पदाचा बहुमान आहे, याची जाणीव मला आहे. तरी या पदाला योग्य तो न्याय देण्याचा मी प्रयत्न माझ्या कार्यकाळामध्ये निश्चितच करेन असे सांगितले.
भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी सौ. प्रणाली सावर्डेकर
