GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणातील दुकानफोडीचा पर्दाफाश; उत्तरप्रदेशमधील दोन चोरट्यांना अटक, एक दिवसाची पोलीस कोठडी

Gramin Varta
159 Views

चिपळूण : शहरातील काविळतळी परिसरातील कोयना ग्लास अँड अॅल्युमिनियम या दुकानात फोड करून सुमारे ७६ हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियम साहित्य चोरीला गेल्याची घटना २३ डिसेंबर रोजी उघडकीस आली होती. या चोरी प्रकरणाचा तपास सुरू असताना चिपळूण पोलिसांनी दोन चोरट्यांना शिताफीने अटक केली असून न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अरुणकुमार अजयकुमार गौतम (वय २९, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या दापोली) आणि सुभाष रामअवतार निसाद (वय २२, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या पिंपळी–तिनवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २२ डिसेंबर रात्री ८ ते २३ डिसेंबर सकाळी ९ या कालावधीत काविळतळी येथील कोयना ग्लास अँड अॅल्युमिनियम दुकानाच्या शेडमागील पत्र्याचे नट–बोल्ट काढून अज्ञातांनी सुमारे ६० हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियम साहित्य चोरून नेले होते.

या चोरी प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्याच्या आधारे अरुणकुमार गौतम आणि सुभाष निसाद हेच चोरीत सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जोगी, शैलेश वनघे यांच्या पथकाने दोघांना शिताफीने अटक केली.
अटक केलेल्या आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रितेश शिंदे करीत आहेत.

Total Visitor Counter

3199550
Share This Article