GRAMIN SEARCH BANNER

लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव जंक्शन विशेष गाडी

Gramin Varta
310 Views

रत्नागिरी: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कोकण रेल्वे महामंडळाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११२९/०११३० लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (ट) विशेष ही विशेष रेल्वे गाडी २५ जानेवारीपासून सुरू केली जाणार आहे.

गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (ट) – मडगाव जंक्शन विशेष गाडी रविवार २५ जानेवारी रोजी दुपारी १ वा. लोकमान्य टिळक (ट) येथून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी १२ वा. मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (ट) विशेष गाडी २५ जानेवारी २०२६, रविवार रोजी २.३० वा. मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (ट) येथे पोहोचेल.

या गाड्या ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर थांबतील. डब्यांची रचना : एकूण १८ डबे २ टायर एसी ०१ डबा, ३ टायर एसी ०३ डबे, स्लीपर ०८ डबे, जनरल ०४ डबे, एसएलआर ०२.

वरील गाड्यांच्या थांब्यांच्या आणि वेळांच्या सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कोकण रेल्वेच्या नवीनतम अपडेट्ससाठी, केआर मिरर अॅप डाउनलोड करा. दरम्यान, गाडी क्रमांक ०१००४/०१००३ मडगाव जंक्शन -लोकमान्य टिळक (ट) मडगाव जंक्शन विशेष गाडीचे परिचालन वेळापत्रक पुढीप्रमाणे आहे. आठवड्याच्या शेवटी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. गाडी क्रमांक ०१००४/०१००३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (ट) मडगाव जंक्शन विशेष गाडी मडगाव जंक्शन -लोकमान्य टिळक (ट) विशेष गाडी २४ जानेवारी २०२६, शनिवार रोजी मडगाव जंक्शन येथून १६:३० वाजता सुटेल.

ही गाडी दुसऱ्या दिवशी ०५.५० वा. लोकमान्य टिळक (ट) येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (ट) मडगाव जंक्शन विशेष गाडी २५ जानेवारी २०२६, रविवार रोजी लोकमान्य टिळक (ट) येथून ०७, ५५ वा. सुटेल. ही गाडी त्याच दिवशी २२:०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. या गाड्या करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. डब्यांची रचना : एकूण २० डबे स्लीपर १८ डबे, एसएलआर ०२. वरील गाड्यांच्या थांब्यांच्या आणि वेळांच्या सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कोकण रेल्वेच्या नवीनतम अपडेट्ससाठी, केआर मिरर अॅप डाउनलोड कराः प्रवाशांनी कृपया या सेवेचा लाभ घ्यावा

Total Visitor Counter

3367951
Share This Article