मुआज मगबूल कोंडकरी वर अनेकांनी केला अभिनंदनचा वर्षाव तर उद्योजक मुस्ताक कापडे यांनी मारली शाब्बासकीची थाप
संगमेश्वर: तालुक्यातील आंबवली गावचा सुपुत्र मुआज मगबूल कोंडकरी यांची आगामी ऑल इंडियन टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढवणारी ही बाब ठरली आहे.
कोंडकरी यांच्या उत्कृष्ट खेळी, सातत्यपूर्ण सराव आणि दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांची राज्य संघात निवड झाली. त्यांच्या या यशाचे क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि सामाजिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.
स्थानिक पातळीपासून राज्यस्तरापर्यंत क्रिकेटमधून लौकिक मिळवलेले मुआज यांच्याकडून आता राष्ट्रीय स्तरावरही भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बोहाचा अगदी ग्रामीण भागातला खेळाडू असून त्याच्या या यशामध्ये अंबवली स्पोर्ट अँड वेल्फेअर असोसिएशन चा मोठा वाटा आहे. घरातून त्याला क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मोठे पाडवळ होते त्याची खेळाडू वृत्ती पाहून घरातल्या आई-बाबांनी त्याला पाठबळ दिले आणि अखेर तो यशाची शिखरे चढण्यास त्याची सुरुवात झाली. त्याचबरोबर गावातील आयकॉन खेळाडू सोबत शिरगावकर, उमेश शिरगावकर यांचे मार्गदर्शन त्याला लाभले गावातील वरिष्ठ मंडळाची पाठराखंड असल्यामुळे मुआजचा आत्मविश्वास वाढला आणि हा प्रवास शक्य झाला.
“संगमेश्वरच्या या खेळाडूचा राष्ट्रीय पातळीवरील प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल”, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या निवडीबद्दल माध्यमिक विद्यामंदिर तामाने स्थानिक मंडळ ग्रामस्थ अधिकारी वर्ग नातेवाईक तसेच खेळाडू मुआजचे अभिनंदन केले आहे. यामध्ये अभिजीत सप्रे सर शिंदे सर मुबारक कानकडी नासिर कोण करी खालीच शिरगावकर मेहबूब बालगुणकर मेहबूब शिरगावकर शरीफ तामसकर सादिक आंबेडकर, कासम महेर , युनूस कोंडकरी, आरिफ शिरगांवकर, लांबे फकीर, सर्फराज कोंडकरी, नबील कोंडकरी यांच्यासहित ग्रामस्थांनी त्याचे कौतुक केले आहे. तर संगमेश्वर तालुक्यातील आंबा व्यापारी आणि प्रसिद्ध उद्योजक मुश्ताक कापडे यांनी या खेळाडूचे पोट भरून कौतुक केले आहे असे खेळाडू संगमेश्वर तालुक्यात निर्माण झाले आणि त्यांनी तालुक्याचे आणि आंबोवली गावाचं नाव उज्वल केलं आणि आपलं कौशल्य दाखवलं अशा या खेळाडूच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याचे अभिनंदन केले.