मकरंद सुर्वे / संगमेश्वर
मुंबई-गोवा महामार्गावर आर्टिगा आणि होंडाई या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता झाला.
आर्टिगा ही रत्नागिरीकडे निघालेली असताना, होंडाई मुंबईहून देवगडकडे येत होती. हा अपघात आरवलीजवळील नवीन पुलावर झाला. पुलावरील चुकीच्या डायव्हर्टमुळे पुढील वाहनचालकाला दिशाभूल झाली आणि त्यामुळे समोरासमोर धडक झाली, अशी माहिती घटनास्थळी उपस्थितांनी दिली.
हा अपघात महामार्गावरील कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे झाला असल्याचे बोलले जात आहे. वेळेवर योग्य सूचना किंवा स्पष्ट दिशादर्शक नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत. हा अपघात मोठा होण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने गंभीर परिणाम टळले.
मुंबई-गोवा महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक, प्रवासी बचावले
