GRAMIN SEARCH BANNER

निसर्गसंपन्न जैतापूरच्या खाडीकिनारी “डिलाईट होम स्टे”चा शानदान शुभारंभ

Gramin Varta
81 Views

राजन लाड / जैतापूर :निसर्गरम्य जैतापूरच्या खाडीकिनारी असलेल्या श्री. सुभाष राजाराम दांडेकर यांच्या घरात “डिलाईट होम स्टे”चा शानदान शुभारंभ पार पडला. या होम स्टेचे उद्‌घाटन श्री. सुभाष दांडेकर आणि त्यांच्या पत्नी सौ. स्मिता दांडेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या होम स्टेची स्थापना राकेश दांडेकर आणि अनुजा दांडेकर यांनी केली असून, पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले हे होम स्टे जैतापूरच्या पर्यटन क्षेत्रात एक आकर्षक पाऊल मानले जात आहे.

या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दांडेकर परिवाराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये जैतापूरचे मा. सरपंच तथा जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, राज्य युवा पुरस्कार विजेते व ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर, शिवसेना माजी विभागप्रमुख नंदू मीरगुले, उपसरपंच मिनल माजरेकर, जैतापूर हायस्कूलचे माजी प्राचार्य विलास डंबे सर, ज्येष्ठ शिक्षक प्रसाद पंगेरकर, हॉटेल कोकण स्वादचे मालक जलाल काझी, माजी उपसरपंच प्रसाद माजरेकर व विकास माजरेकर, जयभवानी कला आणि क्रीडा मंडळ, माजरेकरवाडी जैतापूरचे अध्यक्ष पंकज पाटील, दळे ग्रामपंचायत सदस्या स्नेहल गिरकर, स्वरांजली करगुटकर, नाटे येथील सामाजिक कार्यकर्ते बंड्याशेठ चव्हाण, धाउलवल्लीचे सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव,
तसेच ओमकार मांजरेकर, प्रितेश देवळेकर, सागर पवार, परेश भाटकर, मिलिंद गिरकर, प्रणव गिरकर, अन्या माजरेकर, मुबिन तडवी, संतोष हरचकर, सुहास पवार, शशांक पावसकर आणि स्वप्नील करगुटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर दळे गावचे सरपंच श्री. महेश करगुटकर, सदस्य श्री. संकेत लासे, सामाजिक कार्यकर्ते श्री हर्षद मांजरेकर, स्वप्नील सोगम आणि वैभव स्वॉ मिलचे मालक श्री. वैभव कुवेसकर यांनी उपस्थित राहून डिलाईट होम स्टेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी परिसरातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत “डिलाईट होम स्टे”च्या सुंदर वातावरणाचे व व्यवस्थेचे कौतुक केले.

Total Visitor Counter

2659775
Share This Article