GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: कापडगाव येथे खांब कोसळून वायरमन गंभीर जखमी

रत्नागिरी: आज सकाळी कापडगाव सुतारवाडी येथे विद्युत वाहिनी दुरुस्त करत असताना लोखंडी खांब कोसळल्याने, त्यावर काम करणारा वायरमन सुचित सुरेश घाणेकर (मूळ रा. खानू, सध्या नेमणूक कापडगाव) खाली पडून गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास सुतारवाडी येथे सुचित घाणेकर हे विद्युत खांबावर चढून वीज वाहिनी दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी अचानक खांब कोसळला आणि सुचित थेट जमिनीवर आपटले.

घटनेनंतर त्यांना तातडीने पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2455606
Share This Article