देवरुख: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील कु. सार्थक प्रकाश आडशे (इयत्ता: ११वी वाणिज्य-ब) याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघातून सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली आहे. रत्नागिरी डिस्ट्रिक्ट ॲम्याच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने एस.व्ही.जे.सी. ट्रस्टच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे आयोजित केलेल्या १८ वर्षाखालील(मुले) गटातील रत्नागिरी डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप: २०२५ मधील स्पर्धेत सार्थक आडशे याने उंच उडी मध्ये १:५० मी. उडी मारून प्रथम क्रमांक, तर गोळाफेक मध्ये ११:२० मी. फेक करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सार्थक याची दोन्ही स्पर्धा प्रकारांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा २ व ३ सप्टेंबर, २०२५ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे.
सार्थक आडशे याने मिळवलेल्या यशासाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील आणि कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना समन्वयक प्रा. धनंजय दळवी उपस्थित होते. सार्थक याला महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक श्री. संजय इंदुलकर आणि श्री. प्रसाद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सार्थक आडशे याने मिळवलेल्या यशासाठी पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. वसंत तावडे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.