दापोली : तालुक्यातील इनामपांगरी येथे फैज अली महमूद नांदगावकर (वय 58) या प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैज अली नांदगावकर (रा. इनामपांगरी) हे 8 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गावाजवळील नदीवर मासे मारण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत, त्यामुळे त्यांच्या शोधासाठी नदी परिसरात पाहणी करण्यात आली.
शनिवार, 9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास इनामपांगरी नदीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दापोली इनामपांगरी येथे प्रौढाचा मृत्यू
