GRAMIN SEARCH BANNER

माखजन हायस्कूल च्या विद्यार्थ्यांची विभागस्तरासाठी निवड

मकरंद सुर्वे /संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील माखजन इंग्लिश स्कूल व ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,माखजन इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद च्या विद्यार्थ्यांनी डेरवण येथे झालेल्या विविध स्पर्धामध्ये घवघवीत यश  संपादन केले आहे.

यामध्ये रत्नागिरी जिल्हा स्तरीय सॉफ्ट टेनिस (मुली) स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात तन्वी पकडे (प्रथम),अदिती साळवी (तृतीय),सानिका कुळे (चौथी),श्रेया फणसे (पाचवी), १७ वर्षाखालील गटात,समृद्धी मोबारकर(द्वितीय),जान्हवी गोताड (तृतीय),बुशरा कापडी (प्रथम) क्रमांक पटकवला या सर्व विद्यार्थ्यांचे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक क्रांती म्हैसकर,निखिल वारके, प्रा अभिजित सुर्वे,सचिन कदम आदीनी  मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्था अध्यक्ष किशोर साठे,उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव दीपक पोंक्षे,शाळा समिती अध्यक्ष मनोज शिंदे,सहसचिव दीपक शिगवण,सुभाष सहस्त्रबुद्धे,मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री राजेसावंत भोसले व अन्य संचालकांनी व पालकानी अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

2474889
Share This Article