GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म लगत कचऱ्याचे ढीग

Gramin Varta
83 Views

दुर्गंधी, धूर आणि डासांचा सुळसुळाट ; येथील व्यवस्थापनची उदासीनता

संगमेश्वर /एजाज पटेल

संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म लगत साचलेला कचरा सध्या गंभीर समस्या बनला असून, संपूर्ण परिसर दुर्गंधी, धूर व अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असताना, याबाबत येथील रेल्वे स्थानक व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
प्लास्टिक, अन्नकचरा, कागद, थर्माकोल यांचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यात येतो. हा कचरा वेळेवर उचलला जात नसून, अनेकदा त्याच ठिकाणी जाळला जात असल्याने परिसरात दाट धूर पसरतो. या धुरामुळे श्वसनाचे विकार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

     कचरा जाळणे म्हणजे थेट कायद्याची पायमल्ली,घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणे पूर्णतः बेकायदेशीर आहे. विशेषतः प्लास्टिक कचरा जाळल्यास विषारी वायू निर्माण होतात, जे मानवी आरोग्यास आणि पर्यावरणास अत्यंत घातक आहेत. असे असतानाही संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार वारंवार घडत असल्याने येथील व्यवस्थापनाची निष्काळजीपणा उघड होत आहे.

    Bडास–मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव साचलेल्या कचऱ्यामुळे व पाण्याच्या साठ्यामुळे डास व मच्छर मोठ्या प्रमाणावर वाढत असून, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब अधिकच चिंताजनक ठरत आहे.

        स्वच्छ भारत अभियानाची केवळ औपचारिकता?केंद्र व राज्य शासन स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यावर भर देत असताना, संगमेश्वर रेल्वे स्थानकातील ही अवस्था प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. रल्वे स्थानक हे शहराचे प्रवेशद्वार असते, मात्र येथे दिसणारी अस्वच्छता प्रवाशांसाठी लज्जास्पद ठरत आहे.

         *येथील व्यवस्थापन थेट जबाबदार*
रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, कचरा जाळण्यास आळा घालणे व आरोग्यदायी वातावरण राखणे ही जबाबदारी थेट येथील रेल्वे स्थानक व्यवस्थापनाची आहे. मात्र सद्यस्थितीत व्यवस्थापन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.शासनाने घालून दिलेल्या स्वच्छता नियमांची तातडीने अंमलबजावणी करून संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ करणे, अन्यथा ही समस्या भविष्यात अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Total Visitor Counter

3072969
Share This Article