मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन कामकाज १८ जुलैपर्यंत होणार आहे. अधिवेशन कामकाजाच्या नियोजनासाठी आज विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.
या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसेच सदस्य भास्कर जाधव, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, अमीन पटेल, भाई जगताप, प्रविण दरेकर, प्रसाद लाड व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पावसाळी अधिवेशनातील कामकाजाची रूपरेषा, चर्चा आणि शासकीय विधेयकांच्या मांडणीसंदर्भातील नियोजनावर चर्चा झाली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न; पावसाळी अधिवेशनाचे १८ जुलैपर्यत कामकाज
