GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जगबुडी नदीपात्रात आढळला मृतदेह

Gramin Varta
90 Views

खेड: गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुडोशी येथील एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज जगबुडी नदीच्या पात्रात तरंगताना मिळून आला आहे. काशीनाथ रामचंद्र झोरे (रा. कुडोशी खापरेवाडी, ता. खेड) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काशीनाथ झोरे हे २० जानेवारी २०२६ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी मनीषा काशीनाथ झोरे यांनी खेड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच, आज २३ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास कुडोशी गवळटेप येथील जगबुडी नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती समोर आली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता तो काशीनाथ झोरे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी खेड पोलिसांनी घटनेची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3370143
Share This Article