राजापूर/ राजू सागवेकर: इंडियन ऑइलने नववर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी आणलेल्या “न्यू इयर धमाका ऑफर” ला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. राजापूर तालुक्यातील मीठगवाणे येथील सिद्धी पेट्रोल पंपावर या योजनेअंतर्गत ९ भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळाली आहेत. या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंडियन ऑइलने देशभरात आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. “न्यू इयर धमाका ऑफर” अंतर्गत, ग्राहकांना ३०० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे पेट्रोल किंवा डिझेल भरल्यावर एक कूपन दिले जात होते. महाराष्ट्राभरातून जमा झालेल्या या कूपन्समधून इंडियन ऑइलकडून लकी ड्रॉ काढण्यात आला. यात सिद्धी पेट्रोल पंपावरील नऊ ग्राहक विजेते ठरले.
भाग्यवान विजेते आणि त्यांची बक्षिसे:
राजू सागवेकर – पॉवर बँक
नितीन कणेरी – वायरलेस स्टेरिओ
विलास धुरी – स्मार्ट वॉच
सूर्यकांत मोरये – व्हॅक्युम क्लिनर
अश्विनी गवाणकर – इस्त्री
रविकांत बाणे – व्हेजिटेबल चॉपर
सिद्धेश गोठणकर – व्हेजिटेबल चॉपर
मनोहर धुरी – नेकबँड (हेडफोन)
बंड्या शिंदे – ब्लूटूथ स्पीकर
सिद्धी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाने सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले असून, त्यांना आपली बक्षिसे पंपावर येऊन स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्राहकांचा उत्साह वाढतो आणि त्यांच्यामध्ये ब्रँडबद्दलची निष्ठा अधिक दृढ होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.