GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने पडल्याने तरुणाचा मृत्यू

दापोली: तालुक्यातील जोगळे खोडा पाटीलवाडी येथे दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन पडल्याने एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १ मार्च रोजी रात्री उशिरा घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मॅनूद्दीन मेहबूब मुल्ला (वय ३०, मूळ रा. यादगिरी, कर्नाटक, सध्या रा. खोडा, ता. दापोली) हा तरुण रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आपली दुचाकी (क्रमांक MH 08 AH 3850) घेऊन जोगळे खोडा पाटीलवाडी येथील सिमेंटच्या पाखाडी रस्त्यावरून जात होता. किरण भंडारी यांच्या घरासमोरून जात असताना अचानक त्याचा दुचाकीवरील तोल गेला आणि तो रस्त्याच्या बाजूला कोसळला. या अपघातात मॅनूद्दीन याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच किरण भंडारी यांनी आपल्या रिक्षामधून जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून रात्री ११.५० वाजता मृत घोषित केले.

या घटनेची अधिकृत नोंद दापोली पोलीस ठाण्यात २ मार्च रोजी पहाटे १.४१ वाजता करण्यात आली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळचा कर्नाटक राज्यातील असलेला हा तरुण कामानिमित्त दापोलीत वास्तव्यास होता, त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3301482
Share This Article