GRAMIN SEARCH BANNER

‘फास्टॅग’ वार्षिक पासच्या शुल्कात १ एप्रिल पासून होणार वाढ

Gramin Varta
100 Views

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ‘फास्टॅग’ वार्षिक पासच्या शुल्कात २.५ टक्क्यांनी वाढ केली असून, सध्याचे तीन हजार रुपये शुल्क आता ३,०७५ रुपये होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून हे दर लागू होणार आहेत.ही वाढ महागाईशी निगडित असलेल्या किरकोळ किंमत निर्देशांकांच्या आधारे करण्यात आली आहे. मात्र, शुल्कवाढ मर्यादित असल्यामुळे नियमित महामार्ग वापरणाऱ्या वाहनधारकांना या पासमुळे होणारी बचत कायम राहणार आहे. शुल्कवाढ केवळ ७५ रुपये असल्याने नियमित प्रवाशांसाठी एका फेरीचा खर्च साधारण १५ रुपयांपर्यंतच राहील, जो नियमित टोलच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.५६ लाख वापरकर्त्यांना फटकासध्या देशात ५६ लाखांहून अधिक वाहनधारकांकडे वार्षिक पास आहे. महामार्गावरील एकूण कार व्यवहारांपैकी २८ टक्के व्यवहार याच पासच्या माध्यमातून होतात. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि रांगा कमी करण्यासाठी प्राधिकरणाने नियमावली अधिक कडक केली आहे.कसा होतोय फायदा?फास्टॅग वार्षिक पास कार, जीप आणि व्हॅन अशा खासगी वाहनांसाठी उपलब्ध असून, वर्षभरात २०० वेळा टोल ओलांडण्याची सुविधा यात मिळते. या पासद्वारे वाहनधारकांना वर्षभरात २०० टोल प्रवास करण्याची परवानगी मिळते किंवा एक वर्ष पूर्ण होईपर्यंत तो वैध राहतो.

Total Visitor Counter

3369755
Share This Article