मुंबई: कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान उंच लाटांचा इशाराही देण्यात आला असून मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. छोट्या होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी किनाऱ्यालगत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळयाने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे चिपळूण, दापोली येथे झाड कोसळून आणि भिंत पडून खासगी मालमत्तांचे नुकसान झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
कोकण किनारपट्टीवर पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा, उंच लाटा उसळणार, मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

Leave a Comment