GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनतर्फे आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिन

Gramin Varta
106 Views

रत्नागिरी: आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त मिऱ्या (पांढरा) समुद्रकिनाऱ्यावर विविध संस्थांच्या सहभागातून भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.प्लास्टिकसह घरगुती टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणावर गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

या उपक्रमात जलजीविका संस्था, शिवाजी हायस्कूल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, सागरी सीमा मंच, स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट या संस्थांनी घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली व स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले. संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

यावेळी सागरी सीमा मंचाचे स्वप्नील सावंत, संजीव लिमये, रंजन आगाशे, जलजीविका संस्थेचे चिन्मय दामले, राज पवार, सृष्टी सुर्वे, समृद्धी सनगरे,तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ केतन चौधरी, डॉ. आसीफ पागरकर व अन्य अधिकारी आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

शिवाजी हायस्कूलचे शिक्षक मारुती पाटील, सौ. गौरी शितूत, श्री. सावंत, श्री. सनगरे आणि 54 विद्यार्थी अभियानात सहभागी झाले. विद्यार्थ्यांना व सर्व सहभागी लोकांना जलजीविका संस्थेकडून हॅण्डग्लोव्ह्ज व पिण्याचे पाणी तर सागरी सीमा मंचाकडून अल्पोपाहार पुरविण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्वच्छ सागर-सुरक्षित सागर- समृद्ध सागर ही प्रतिज्ञा घेतली. समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.

Total Visitor Counter

3367698
Share This Article