रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम
रत्नागिरी: रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत, खासदार नारायणराव राणे यांच्या प्रेरणेतून मिऱ्या येथील दोन गरजू नागरिकांना डिजिटल श्रवणयंत्र प्रदान करून एक स्तुत्य उपक्रम राबवला. या कार्यात भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा मोलाचा सहभाग होता.
गरजूंना सहाय्य करण्याच्या उद्देशाने मंडळाचे कार्यकर्ते ययाती शिवलकर यांनी मिऱ्या येथील रमेश पांडुरंग शिरधनकर आणि विनायक काशिनाथ मोरे यांना श्रवणयंत्राची नितांत आवश्यकता असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांच्यापर्यंत पोहोचवली. या विनंतीची तात्काळ दखल घेत खासदार राणे यांनी अलिम्को संस्थेच्या सहकार्याने अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र उपलब्ध करून दिली.
या उपक्रमासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांनी विशेष सहकार्य केले. लाभार्थ्यांना श्रवणयंत्र सुपूर्त करताना मंडळाचे सदस्य ययाती शिवलकर, निखिल शेट्ये, योगेश मगदूम, अमृत गोरे आदी उपस्थित होते.
खा. नारायण राणे यांच्या प्रेरणेतून गरजूंना डिजिटल श्रवणयंत्र
