GRAMIN SEARCH BANNER

महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर ‘टेरिटोरियल आर्मी’ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

Gramin Varta
190 Views

दिल्ली: देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये यावर्षी एक ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला. ९३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, एका महिला ऑफिसर कॅडेटने या प्रतिष्ठित संस्थेत यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

अभिमानाची बाब म्हणजे हा सन्मान महाराष्ट्राची कन्या असणाऱ्या कोल्हापूर येथील रहिवासी सई जाधव हिने मिळवला आहे.

सई जाधव हिने प्रादेशिक सैन्याच्या विशेष अभ्यासक्रमांतर्गत कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि आता ती लेफ्टनंट बनली आहे. सई जाधव हिची कामगिरी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षा आणि SSB मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर सई जाधवची निवड झाली होती. तिने IMA मध्ये सहा महिन्यांचे आव्हानात्मक लष्करी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कठीण होते.

सई जाधवचे कुटुंब दीर्घकाळापासून देशसेवेशी जोडलेले आहे. तिचे वडील संदीप जाधव हे भारतीय सैन्यात मेजर आहेत. तिचे आजोबा ब्रिटिश सैन्यात सेवा बजावत होते.

Total Visitor Counter

3375164
Share This Article