देवरुख : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटातील दख्खीण बौद्धवाडी येथे आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका एसटी बसने उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, एसटी चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनू हल्लुलाल वर्मन (१९, सध्या रा. देवळे कॅम्प, ता. संगमेश्वर, मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी अझरुद्दीन मेहबूब शेख (वय ३९, व्यवसाय नोकरी, रा. आझाद गल्ली, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हा त्याच्या ताब्यातील एम.एच-१४.बी.टी २७२२ या क्रमांकाची एसटी बस घेऊन जात होता.
आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील दख्खीण बौद्धवाडी येथे रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता, एसटी बस चालकाने अत्यंत धोकादायक आणि निष्काळजीपणे बस चालवली. यामुळे त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एम.एच १० डी.टी ७९९१ या क्रमांकाच्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे अपघात होऊन दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी, सोनू हल्लुलाल वर्मन यांच्या तक्रारीनुसार, देवरुख पोलीस ठाण्यात १९ जून रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
देवरुख : आंबा घाटात एसटी बसची डंपरला धडक, वाहनांचे नुकसान

Leave a Comment