GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरातील बेपत्ता 15 वर्षीय युवतीचा मृतदेह जयगड खाडीत आढळला

Gramin Varta
40 Views

संगमेश्वर : तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर रामाणेवाडी येथून बेपत्ता झालेल्या 15 वर्षीय युवतीचा जयगड देऊड खाडीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मानसी मंगेश भायजे (15, संगमेश्वर रामानेवाडी) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता मानसी ही संगमेश्वर येथून बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेरीस संगेमश्वर पोलिस ठाण्यात मानसी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. दरम्यान सोमवार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता तिचा मृतदेह देऊड येथील खाडीत आढळून आला. परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर जयगड पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. जयगड पोलिसांनी तिची चौकशी केली असता संगमेश्वर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांशी संपर्क साधून तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जवळपास 8 दिवसांनी तिचा मृतदेह रत्नागिरी जयगड येथील देऊड खाडीत आढळल्याने नातेवाईकांनी हंबरडा फोडला. या घटनेची नोंद जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

दरम्यान मानसी ही केवळ 15 वर्षाची मुलगी आहे. ती बेपत्ता होण्याचे कारण काय? तिने आत्महत्या केली की घातपात याचा पोलिस तपास जयगड करत आहेत.

Total Visitor Counter

2645294
Share This Article