राजापूर : रविवार १३ जुलै २०२५ रोजी आंबोळगड येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात भंडारी समाज कमिटी आंबोळगड यांच्या वतीने ‘शालेय साहित्य वाटप कार्यक्रम’ यशस्वीरित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमात ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल यांसह अंगणवाडी ते चौथी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तर इत्यादी साहित्य देण्यात आले.
कार्यक्रमास भंडारी समाज कमिटी आंबोळगड चे अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भंडारी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज आडविरकर यांनीही उपस्थित राहून सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
राजापुरातील आंबोळगड येथे भंडारी समाजातर्फे शालेय साहित्य वाटप
