चिपळूण: चिपळूणचे आमदार शेखर निकम यांची हिंदी भाषा प्रचार समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. निकम यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्याक सेलच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
निकम यांच्या निवडीमुळे कोकणात हिंदी भाषेच्या वाढीला नक्कीच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, उपाध्यक्ष इमाम शहा, डॉ. शामिना परकार आदी उपस्थित होते.
आ. शेखर निकम यांची हिंदी भाषा प्रचार समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड
