रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. सर्व सदस्यांच्या एकमताने ही निवड झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमर रहाटे होते. निवडीनंतर सौ. ऋतुजा कुळकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सौ. ऋतुजा कुळकर्णी या सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या नेतृत्ववृत्तीच्या स्त्री असून, गावातील महिला, युवक, वंचित घटकांसाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकसहभाग या मूल्यांच्या आधारे ग्रामपंचायतीचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उपसरपंच सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हास्तरीय भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरीचे पदाधिकारी, तालुका पदाधिकारी सर्व आजी माजी पदाधिकारी यांचे विशेषता आभार मानले.
ग्रामपंचायत धामणसेमध्ये दुसऱ्यांदा निवडून येऊन व आज उपसरपंच होताना त्यांनी आपले कुटुंबीय व पती उमेश कुळकर्णी, वॉर्ड नंबर २ चे सर्व मतदार, ग्रामपंचायत सदस्य सहकारी, व कर्मचारी वृंद यांची त्यांना अशीच साथ मिळावी अशी इच्छा सौ. कुळकर्णी यांनी व्यक्त केली.
बैठकीला ग्रामसेवक परशुराम इंगळे, सदस्य माजी उपसरपंच अनंत जाधव, सौ. वैष्णवी धनावडे, सौ. रेश्मा डाफळे, समीर सांबरे, संजय गोंनबरे, दिपक रेवाळे आणि सौ. सिध्दी कानडे, अविनाश लोगडे, विश्वास रहाटे, संतोष जाधव, सूर्यकांत रहाटे, मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी, श्री. रत्नेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी, माजी अध्यक्ष शेखर देसाई, विजय लोगडे, गणेश लोगडे, राजेंद्र डाफळे, अनिल जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.