GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत रस्त्यावर उभी केलेली दुचाकी चोरीस

Gramin Varta
32 Views

दापोली: तालुक्यातील हर्णे धुळपवाडी येथे अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरी करून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ५ जुलै रोजी रात्री ८.३० वाजेपासून ते ६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत घडली. याप्रकरणी फिर्यादी शशिकांत महादेव शेळके (वय ३८, रा. हर्णे, धुळपवाडी) यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी शेळके यांनी त्यांच्या मालकीची प्रेशियस डायमंड होडा कंपनीची मोटरसायकल (क्रमांक MH-16-AR-7006) घरासमोरील रस्त्यावर उभी केली होती. परंतु रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सदर मोटरसायकल चोरून नेल्याचे आढळले. चोरीस गेलेल्या वाहनाची किंमत सुमारे १५,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Total Visitor Counter

3366860
Share This Article