GRAMIN SEARCH BANNER

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे – मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी : “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन समागमाबाबत प्रचार व प्रसिध्दी करावी, अशी सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. श्रीमती रानडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व गटविकास अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील उपस्थित होते.

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. श्रीमती रानडे म्हणाल्या, गटशिक्षणाधिकारी यांचा वेळोवेळी आढावा घेऊन, त्यांना दिलेल्या सुचनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. श्री. सतीदर सरताज यांचे “हिंद-दी-चादर” गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकालावर आधारित भक्ती गीत ग्रामपंचायतीमधील लाऊड स्पीकर वरती ऐकवावे. “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथील प्रस्तावित समागमचे प्रचार प्रसिद्धी बॅनर गावामध्ये प्रवेशाच्या व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत.

सर्व ग्रामपंचायत मध्ये दररोज सकाळी स्वच्छता मोहीम राबवावी. सर्व शाळांमध्ये शिक्षण विभागास दिलेल्या निर्देशाचे अंमलबजावणी होत आहे की नाही याची पाहणी करणे. या उपक्रमात उत्कृष्ट ठरणाऱ्या ५ ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार असून, या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर सन्मानित करण्यात येईल.

या शहीदी समागम निमित्ताने 25 फेब्रुवारीपर्यंत आरोग्य पंधरवडा राबवावयाचा असल्याने ठिक ठिकाणी, गावा-गावात, वस्ती-वस्तीमध्ये विविध वैद्यकीय शिबीरांचे (Medical Camps) आयोजन करावे. या वैद्यकीय शिबीरांमध्ये शहीदी समागमचे प्रचार-प्रसिध्दी बॅनर दर्शनी भागावर प्रमुख स्थळी लावावेत. याबाबतीत सर्व आरोग्य केंद्रांना, रूग्णालयांना लक्ष्यांक दिले जावेत. जिल्हास्तरावर उत्कृष्ट ठरणाऱ्या दोन डॉक्टर व दोन कर्मचारी यांचा यथोचित सन्मान राज्यस्तरावर करण्यात येईल.

Total Visitor Counter

3401530
Share This Article