चिपळूण-सावर्डे अपहरण सत्र: पुणे आणि मुंबईतून पाच आरोपींना अटक; ४ दिवसांची पोलीस कोठडी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण: पैशांच्या देवाणघेवाणीतून चिपळूण आणि सावर्डे परिसरात दोन तरुणांच्या झालेल्या अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी पुणे व मुंबई येथून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. चिपळूण येथील शुभम पवार अपहरण प्रकरणात मुख्य संशयित प्रतीक भोसले (३०, रा. येरवडा-पुणे) याला अटक केली असून, सावर्डे येथील सिद्धेश शिंगरे याच्या अपहरण प्रकरणात मुंबईतील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चिपळूणच्या मार्कंडी भागातून दोन दिवसांपूर्वी शुभम पवार (२९) याचे अपहरण झाले होते. तपासादरम्यान संशयित प्रतीक भोसले याचा मोबाईल बंद असल्याने अडचणी येत होत्या, मात्र पोलिसांच्या दबावामुळे आरोपी स्वतः लोणंद पोलीस ठाण्यात शुभमसह हजर झाला. शुभमने क्रशर व्यवसायासाठी घेतलेले २० लाख रुपये परत न केल्याने हे अपहरण केल्याची कबुली आरोपीने दिली असून त्याचे इतर तीन साथीदार अद्याप फरार आहेत. दुसरीकडे, ३ एप्रिल रोजी सावर्डे बाजारपेठेतून सिद्धेश शिंगरे या २० वर्षीय तरुणाचे अपहरण झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी मुंबईतून तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, राजू गायकवाड व विनोद टक्के या चौघांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *