GRAMIN SEARCH BANNER

जे. डी. पराडकर यांच्या ‘ अक्षरयात्रा ‘ पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर

Gramin Varta
154 Views

▪️चपराक प्रकाशनची निर्मिती, कोरोना काळातील लेख संग्रह

संगमेश्वर :- कोकण मराठी साहित्य परिषदेचे  २०२३-२४ चे वाड:मयीन पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये  लोवले संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या पुणे येथील चपराक प्रकाशित ‘ अक्षरयात्रा ‘ या लेखसंग्रहास द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

अक्षरयात्रा हे जे. डी. पराडकर लिखित सहावे पुस्तक पुणे येथील चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील यांनी स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पुठ्ठा बांधणी आणि २५६ पानांचे तयार केले. या पुस्तकाचे प्रकाशन पुणे पुस्तक महोत्सवात खा. सुप्रिया सुळे, महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे, संपादक घनश्याम पाटील यांच्या हस्ते झाले होते. या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार विष्णू परीट यांनी तर नावाची रचना कोल्हापूर येथील निर्मितीचे अनंत खासबागदार यांनी, प्रस्तावना सोलापूरचे प्रसिद्ध लेखक समीर गायकवाड, पाठराखण मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे. सतीश डिंगणकर यांनी देखील या पुस्तकासाठी मोलाचे सहकार्य केले.

कोकणातील व्यक्तिमत्व, चालिरिती, परंपरा, पर्यावरण, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर लेखन करणाऱ्या संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांची चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी आजवर दहा पुस्तकं प्रकाशित केली आहेत. अक्षरयात्रा या पुस्तकात पराडकर यांनी कोरोना काळात सलग १०० दिवस लिहिलेल्या १०० ललित लेखापैकी ६४ लेखाचा समावेश आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेने जे. डी. पराडकर यांच्या लेखनाचा गौरव केल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्काराबद्दल जे. डी. पराडकर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद आणि घनश्याम पाटील संपादक चपराक प्रकाशन यांना धन्यवाद दिले आहेत.

Total Visitor Counter

2647084
Share This Article