GRAMIN SEARCH BANNER

देवरुखात दीडशे वर्षाचा महाकाय वृक्ष उन्मळून पडला; मंदिरासह लाखोंचे नुकसान

Gramin Varta
10 Views

संगमेश्वर :  शहरातील आंबेडकर नगर येथे शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सुमारे दीडशे वर्षे जुना असलेला एक महाकाय शेवर वृक्ष अचानक उन्मळून पडला. या घटनेत ‘चंडिका देवीचे मंदिर जमीनदोस्त झाले असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राच्या भिंती कोसळल्या आणि छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या दुर्घटनेत दोन घरे, बुद्धविहार, नळपाणी योजनेची पाण्याची टाकी, तसेच वीज खांबाचा देखील मोठा फटका बसला आहे. सुरेश जाधव आणि सुषमा कदम यांच्या घरांचे पत्रे उडाले, मीटर निखळले. मात्र, सुदैवाने कोणालाही शारीरिक दुखापत झालेली नाही.

वृक्ष कोसळल्यानंतर घटनास्थळी तातडीने नगरपंचायतीचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व स्थानिक नागरिक दाखल झाले. कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करण्यात आल्या, तर तुटलेला वीज खांब बदलण्यात आला.

Total Visitor Counter

2652430
Share This Article