GRAMIN SEARCH BANNER

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी श्रावणी इप्तेची निवड; देवरूख क्लबकडून तायक्वांदोपटूंचा सत्कार

Gramin Varta
42 Views

संगमेश्वर : राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी श्रवणी सचिन इप्ते या खेळाडूची निवड झाली आहे. तसेच शालेय तायक्वादो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पट्टूंना संगमेश्वर तालुका तायक्वांदो ॲकॅडमी आणि नगरपंचायत देवरूख तायक्वांदो क्लब यांच्या वतीने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्री. रोहन सर बने, माजी नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, वैभव पवार, माभळे गावचे सरपंच मनोहर जाधव, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्ठे, क्लब सदस्या रुपाली कदम, पालक प्रतिनिधी आदिती लोध आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक, पालक व उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Total Visitor Counter

3369368
Share This Article