रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावर दाभोळे बाजारपेठेत सोमवारी रात्री कोळसा भरलेला ट्रक पुलाचा कठडा तोडून दुकानात घुसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शंभर वर्षे जुना व अरुंद ब्रिटिशकालीन पूल धोकादायक अवस्थेत असून बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. वारंवार अपघात होण्याचे कारण ट्रकचा भरधाव वेग आणि पुलावरील अपुरी प्रकाशव्यवस्था असल्याचे नागरिकांचे मत आहे.
दाभोळे बाजारपेठेत ट्रक अपघात, पुलाचा कठडा तुटला
