चिपळूण : तालुक्यातील अलोरे शिरगाव, पेढांबे अशा विविध ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या 2 वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरगाव बाजारपेठ, चिपळूण: २७ जून २०२५ रोजी दुपारी १२.१० वाजता शिरगाव बाजारपेठेत चिपळूण ते कराड रोडवर राजेंद्र रामचंद्र जाधव (रा. तळसर) याने आपली मारुती इको गाडी (क्र. एम.एच.०४-जी.जे-३२०७) वाहतुकीस अडथळा निर्माण होईल आणि पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली होती. या प्रकरणी निखिल युवराज जगदाळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुपारी १२.४० वाजता चिपळूण ते अलोरे जाणाऱ्या अंतर्गत रोडवर, पेढांबे मंदार कॉलेजजवळ, फारुख अहमद मुल्लाजी (रा. पोफळी) याने आपली टाटा मॅजिक गाडी (क्र. एम.एच.०८-झेड-३५९८) अलोरे दिशेने जाणाऱ्या बाजूस वाहतुकीस अडथळा आणि पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केली होती. याप्रकरणी निखिल युवराज जगदाळे यांनी फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूणमध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 2 वाहन चालकांवर गुन्हा

Leave a Comment