मकरंद सुर्वे/ संगमेश्वर:भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव सौं. शिल्पाताई मराठे, जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ताई ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली आज संगमेश्वर येथील पोलीस स्टेशनला रक्षाबंधन साजरे कारण्यात आले. आज समाजासाठी रात्रंदिवस अविरत सेवा देणाऱ्या आपल्या पोलीस बांधवाना राखी बांधून कृतन्यता व्यक्त केली. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस/आंबेड ग्रा. सदस्या सौं. नुपुरा मुळ्ये, महिला तालुका सरचिटणीस/माभळे ग्रा. सदस्य सौ. मुग्धा भिडे, उपध्यक्ष सौं. सुमन झगडे, तळेकांटे सरपंच सौ. सुषमा बने, लोवले ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रियंका साळवी, कु. सृष्टी बने, कुरधुंडा बुथ प्रमुख सौ. वर्षा खंडकर, श्रीम. शर्मिला पडये, श्रीम. सुदीक्षा जठार आदी महिला उपस्थित होत्या.
नावडी संगमेश्वर पोलीस स्टेशन येथे भाजपा महिला मोर्चा तर्फे रक्षाबंधन
