GRAMIN SEARCH BANNER

लांजातील किरण कांबळे झाला मुंबई मेट्रोमध्ये लोको पायलट

Gramin Varta
30 Views

लांजा : तालुक्यातील लांजा बौद्धवाडीचा सुपुत्र किरण अरुण कांबळे याने आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. किरण कांबळे यांची मुंबई मेट्रोमध्ये लोको पायलट म्हणून निवड झाली असून, नुकतीच त्यांनी या पदावर औपचारिकरित्या रुजूही झाले आहेत.

हा केवळ किरण यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण बौद्धवाडी आणि लांजा तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ग्रामीण भागातील साध्या पार्श्वभूमीतून येत, विविध अडचणींवर मात करत त्यांनी हे यश मिळवलं आहे. त्यांच्या या वाटचालीने अनेक युवकांना प्रेरणा मिळेल.

किरण यांचे शालेय शिक्षण लांजामध्ये झाले असून, त्यानंतर त्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन रेल्वे व मेट्रो क्षेत्रात करीयर करण्याचा निर्धार केला. त्यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे व मित्रपरिवाराचे मोलाचे मार्गदर्शन आहे.

सध्या मुंबईसारख्या महानगरात एक जबाबदार पदावर काम करत असलेल्या किरण कांबळे यांना परिसरातील नागरिकांकडून, नातेवाईकांकडून व मित्रमंडळींकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. त्यांच्या या यशामुळे बौद्धवाडीत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

Total Visitor Counter

3369587
Share This Article