GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: देसाई बंधूंनी तयार केलेली शीतपेये अमेरिकेत होणार निर्यात

Gramin Varta
457 Views

रत्नागिरी :- तालुक्यातील पावस येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार देसाई बंधू आंबेवाले यांनी मँगो ड्रिंक, रॉ मँगो ड्रिंक आणि कोकम ड्रिंक ही नवीन कोकणी उत्पादने बाजारपेठेत आणली असून, या नव्या उत्पादनाचा प्रारंभ रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. देसाई बंधू आंबेवाले यांनी तयार केलेली ही उत्पादने अमेरिकेत निर्यात केली जाणार आहेत. तसेच देशातील बाजारपेठेत १ एप्रिल पासून उपलब्ध होणार आहेत.

पावस येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार श्री. जयंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश देसाई, आर्य देसाई, तनया देसाई आणि रोहन देसाई या त्यांच्या पुढील पिढीने पुढाकार घेत ही नवीन कोकणी उत्पादने विकसित केली असून, ही सर्व उत्पादने नैसर्गिकरित्या तयार करण्यात आली आहेत. यात कोणत्याही प्रकारचे केमिकल, रंग, कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त पदार्थांचा वापर करण्यात आलेला नाही. पूर्णतः नैसर्गिकरित्या हे उत्पादन तयार करण्यात आले आहे.

प्लेन मँगो ड्रिंक, रॉ मँगो ड्रिंक आणि कोकम ड्रिंक याची किंमत प्रत्येकी रु. ५० अशी आहे. १ एप्रिल पासून ही कोकणी उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध होणार असून, ही सर्व उत्पादने अमेरिकेत निर्यात करण्यात केली जाणार आहेत.

पाली येथे रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या नव्या उत्पादनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आनंद देसाई , अमर देसाई , रोहन देसाई , सुदेश मयेकर आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3386923
Share This Article