GRAMIN SEARCH BANNER

लांजा : सालपे येथे रस्त्यावर गवा रेड्याची दबंग एन्ट्री

Gramin Varta
502 Views

लांजा : तालुक्यातल्या शोपोशी सालपे फाटा येथील रस्त्यावर आज सकाळी गवा रेडा अगदी ऐटीत चालतांना दिसून आला. यामुळे वाहन चालकांची भंबेरी उडाली. अगदी रस्त्याच्या मध्यावरून एक तगडा गवा आरामशीर चालत जाताना ग्रामस्थांच्या नजरेस पडला. आगरी रुबाबात फेरफटका मारणाऱ्या या वन्य पाहुण्यामुळे क्षणभर धडकी भरली. एक दुचाकीस्वार दुचाकी जागेवर सोडून पळून गेला.

समोर अचानक गवा दिसताच वाहनचालकांची पावलं जरा थबकली. तरीही सुरक्षित अंतर राखत सर्वांनी मार्ग काढत परिस्थिती सांभाळली. काही काळाने हा गवा रेडा जंगलाच्या दिशेने गेला.

घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून परिसरात खबरदारी वाढवण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3375631
Share This Article