मुंबई: महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने गेल्यावर्षी १८ जून २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी मासिक आर्थिक मदत देईल, असे सांगण्यात आले.
त्यानुसार दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये ही रक्कम जमा होते. मात्र आता एकापाठोपाठ एक राज्यातील लाडक्या बहिणींना धक्के बसत आहेत. राज्य सरकारने आता ८० हजाराहून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला आहे.
सध्या राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारकडून निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या आयकर विभागाकडून छाननी केली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील जालना आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाच्या छाननीनंतर विविध कारणांमुळे हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत. ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये
