रत्नागिरी : १ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित महसूल दिन समारंभात जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महसूल प्रशासनात त्यांनी बजावलेली कार्यक्षमता आणि प्रशासनात पारदर्शकता व कार्यक्षमतेने दिलेली सेवा याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह होते. प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, कोस्टगार्ड रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर शैलेश गुप्ता, एअर स्टेशन रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर अमित यांनी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील महसूल यंत्रणा अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजाशी जोडलेली बांधिलकी ठेवत कार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
महसूल दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांचा गौरव
