GRAMIN SEARCH BANNER

खेड तिसंगी येथे हातभट्टीची दारूवर धाड ; तरुण ताब्यात

Gramin Varta
58 Views

खेड : तिसंगी–पिंपळवाडी परिसरातील दाट जंगलात लपूनछपून हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या रोशन सुभाष भोसले (३५) या व्यक्तीस खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली असून घटनास्थळावरून सुमारे ७५ हजार रुपयांचा मोठा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

घटनेच्या ठिकाणी तिसंगी रस्त्यालगतच्या उतारावर झुडपांच्या आड भट्टी उभारून भोसले अवैधरित्या दारू गाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचत छापा टाकला असता भोसले हा प्रत्यक्ष दारू गाळण्याच्या कामात आढळून आला.

पोलिसांनी तेथून दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे अॅल्युमिनियमचे पसरट भांडे, १० लिटर गरम उकळते रसायन, १० लिटर गूळमिश्रित तयार दारू, तसेच तब्बल २ हजार लिटर गूळमिश्रित थंड रसायन आणि इतर साहित्य असा मिळून सुमारे ७५ हजारांचा माल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन साव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366895
Share This Article