GRAMIN SEARCH BANNER

कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा आजपासून दापोलीत रंगणार

Gramin Varta
104 Views

रत्नागिरी: ५० वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ आज (८ डिसेंबर) दापोली येथे सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या ट्रॅक सूट आणि टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना रत्नागिरीतील पोलीस परेड मैदान येथे पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या हस्ते ट्रॅक सूट आणि टी-शर्टचे वितरण करण्यात आले.

दापोली येथे होत असलेल्या या स्पर्धांसाठी गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. कोकण परिक्षेत्रातील पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, सिंधुदुर्ग, मीराभाईंदर, नवी मुंबई आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील पोलीस खेळाडू सहभागी होणार आहेत.

Total Visitor Counter

3377110
Share This Article