GRAMIN SEARCH BANNER

राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालय, ईश्वरपूर आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत विलास रहाटे द्वितीय

Gramin Varta
87 Views

देवरुख: राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालय, ईश्वरपूर ता: वाळवा, जि: सांगली यांनी आयोजित केलेल्या ‘राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा: २०२५’ मध्ये देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी साकारलेल्या छत्रपती शिवराय व बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित रांगोळीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. ही रांगोळी साकारण्यासाठी विलास रहाटे यांना २२ तासांचा कालावधी लागला.

आयोजकांनी या स्पर्धेसाठी  ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिचित्र व त्यांच्या जीवनातील प्रसंग’ हा स्पर्धकांसाठी विषय दिला होता. स्पर्धेसाठी ३x४ फुट आकाराची रांगोळी साकारायची होती. या स्पर्धेकरता महाराष्ट्रातील नामवंत ३० स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेकरता रांगोळी साकारण्यासाठी शनिवार दि. १ नोव्हेंबर, २०२५ सकाळी ९:०० ते रविवार दिनांक २ नोव्हेंबर, २०२५ दुपारी ३:०० पर्यंत स्पर्धकांना  कालावधीत दिला होता. श्री. विलास रहाटे यांना द्वितीय क्रमांकासाठी रोख पारितोषिक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनाधीष्ट प्रतिकृतीचे सन्मानचिन्ह, तसेच प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांनी गौरविले. श्री. विलास रहाटे यांनी मिळवलेल्या सातत्यपूर्ण यशाबद्दल देवरुख नगरीत त्यांचे कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3374459
Share This Article