महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बिझनेस हब नेहमी प्रयत्न करणार : जैबा बंदरकर
रत्नागिरी: महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘किचन एक्सप्रेस रत्नागिरी’च्या जैबा शोएब बंदरकर यांनी ‘बिझनेस हब’ प्रदर्शन भरवले. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महिला मंडळात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तीन दिवस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महिला उद्योजकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘बिझनेस हब’ सतत प्रयत्नशील राहील, असे जैबा बंदरकर यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनाचा शुभारंभ साईका म्हसकर, शबनम सय्यद, आजमिना मालगुंडकर, आजरा खान, आसीया, सफिरा नाईक आणि सायमा शेकासन यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रदर्शनात जोया वस्तू, कोकण डायपर, फरहा मुक्री, जुवेरिया फणसोपकर, अमिना, दानिया खान, इनाया, सिमरन पिंजर, रिफा शेख, शैमा, खैरुन्निसा, फरिदा शहा, हुदा डोसानी, सुहाना खांचे, नौशीन मिरकर, सबिहा मस्तान, सायमा, आयशा, पायल बागवे, अल शिफा डेव्हलपर्स आणि किचन एक्सप्रेस रत्नागिरी यांसारख्या विविध महिला उद्योजकांनी सहभाग घेतला होता.
प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘किचन एक्सप्रेस रत्नागिरी’ने ५,००० रुपयांचा लकी ड्रॉ ठेवला होता, तर ‘हुसेन गोट एंपायर, मुंबई’ने विजेत्यासाठी २,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या ड्रॉमध्ये ‘किचन एक्सप्रेस’च्या लकी ड्रॉच्या विजेत्या अलमास मुजावर ठरल्या. त्यांना शकील बंदरकर, शमा बंदरकर आणि शोएब बंदरकर यांच्या हस्ते ५,००० रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. त्याचप्रमाणे ‘हुसेन गोट एंपायर’च्या ड्रॉचे विजेते फणसोपकर ठरले. त्यांना मंजूर सय्यद हसन काद्री यांच्या हस्ते २,००० रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.
याशिवाय, हुसेन गोट एंपायर, मुंबई’तर्फे प्रदर्शनाच्या आयोजिका जैबा बंदरकर यांना इरफाना शकील गवाणकर आणि अजिजा नजीर जमादार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तीन दिवसांच्या या प्रदर्शनाला सुमारे ७०० ते ८०० ग्राहकांनी भेट दिली आणि महिलांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद दिला. ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानताना जैबा बंदरकर यांनी भविष्यातही अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.