GRAMIN SEARCH BANNER

आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे भव्य मोफत हृदयविकार तपासणी शिबिर संपन्न; ९० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

Gramin Varta
256 Views

पाचल (तुषार पाचलकर): राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना आणि युवासेना पाचल विभागाच्या वतीने आरोग्यदायी उपक्रम राबवण्यात आला. अपूर्वा सामंत फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हार्ट सेंटर कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तळवडे उपकेंद्र येथे मोफत हृदयविकार तपासणी, सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ९० पेक्षा जास्त रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

या शिबिराचे उद्घाटन रुग्ण आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत व उत्साहात करण्यात आले. यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटल कोल्हापूरचे हृदयविकार तज्ञ डॉ. चंद्रकांत पाटील यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना मोफत मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये प्रामुख्याने ब्लड शुगर, शारीरिक तपासणी, हृदयविकार, मधुमेह, छातीत धडधड होणे, धाप लागणे, हाता-पायाला मुंग्या येणे किंवा गोळे येणे यांसारख्या व्याधींवर तज्ञ डॉक्टरांनी औषधोपचार व योग्य सल्ला दिला. अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल संपूर्ण परिसरातून अपूर्वाताई सामंत यांचे आभार मानले जात आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तळवडे गावच्या सरपंच सौ. गायत्री साळवी आणि शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित डॉक्टरांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
शिवसेनेच्या युवा महिला नेत्या ॲड. अपूर्वाताई सामंत यांनी स्वतः या शिबिराला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली व शुभेच्छा दिल्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुनील गुरव, सुरेश ऐनारकर, संदीप बारसकर, युवराज मोरे, सोनू पाथरे यांनी विशेष परिश्रम घेतले. करक-कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तळवडे उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी शिबिराचे उत्तम नियोजन केले होते.

या प्रसंगी तळवडे सरपंच गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, करकचे सरपंच सुरेश ऐनारकर, जवळेथर सरपंच अंजली मोरे, पांगरी सरपंच अमर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. दुर्वा तावडे, शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख सुनील गुरव, विभाग प्रमुख शैलेश साळवी, युवा कार्यकर्ते संदीप बारसकर, युवासेना विभाग प्रमुख युवराज मोरे, युवा उद्योजक वैभव वायकूळ, सोनू पाथरे, सचिन पांचाळ, उदय राणे, संदीप मोरे, दीपक सावंत, हर्षद तेलंग, तसेच महिला कार्यकर्त्या माजी पंचायत समिती सदस्य सिद्धाली मोरे, अपेक्षा मासये, श्वेता पवार, विद्या कानडे यांसह अनेक मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासूनच रुग्णांनी रांगा लावल्याने या शिबिराची व्याप्ती आणि गरज अधोरेखित झाली.

Total Visitor Counter

3073151
Share This Article