रत्नागिरी : शहरालगतच्या प्रशांतनगर परिसरात एका वृद्ध महिलेचा अकस्मिक मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घडली. रेखा शिवाजी शिंदे (वय ६७, रा. प्रशांतनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा शिंदे यांच्या पायाला कोन लागल्याने त्यांनी २८ डिसेंबर रोजी स्थानिक डॉक्टरांकडे जाऊन टीटीचे इंजेक्शन घेतले होते. त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यामुळे नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी प्रथम एका खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रेखा शिंदे यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.






