रत्नागिरी : मराठा मंदिर विद्यावर्धिनी स.रा. देशाई डी.एल.एड. कॉलेजमधील संवेदनशील, कल्पक, विचारवंत व उपक्रमशील प्राध्यापक श्री. सुनिल रामा जोपळे यांची नुकतीच रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या SAMVAD युनिटमध्ये ‘समाजसेवक’ म्हणून नियुक्ती झाली आहे.
ही नियुक्ती मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखालील NALSA योजना २०२५ अंतर्गत करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश सीमांत, असुरक्षित, आदिवासी तसेच विमुक्त व भटक्या जमातींना न्याय मिळवून देण्यासाठी सुविधा मजबूत करणे आहे. या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने प्रा. जोपळे यांची समितीवर निवड झाली आहे.
या नियुक्तीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे मा. अध्यक्ष सुनील एस. गोसावी आणि सचिव मा. आर.आर. पाटील यांच्या स्वाक्षरीने अधिकृत आदेश देण्यात आले आहेत.
प्रा. जोपळे हे “ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल (OFROT)” या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष असून, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून, ते एक उत्तम वक्तेही आहेत.
ट्रेस मॅनेजमेंट, संवाद कौशल्य, मोटिवेशन, करिअर मार्गदर्शन, गोल सेटिंग, ध्येय निर्धारण यांसारख्या विषयांवर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले आहे. सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आणि उत्तरदायित्व यांची जाण असलेले प्रा. जोपळे हे उत्तम विचारवंत आणि संवेदनशील समाजसेवक म्हणून परिचित आहेत.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत SAMVAD युनिटमध्ये प्रा. सुनिल जोपळे यांची ‘समाजसेवक’ म्हणून नियुक्ती
