GRAMIN SEARCH BANNER

गुहागरात राजकीय उलथापालथ: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का

Gramin Varta
31 Views

भाजपचे उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष आणि ओबीसी नेते संतोष जैतापकर यांचे शिवसेनेत शिंदे गटात जाहीर प्रवेश

गुहागर/ शहीद तुळवे: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर, गुहागर तालुक्यात एक मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. भाजपचे उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष आणि ओबीसी नेते संतोष जैतापकर यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे, तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलली आहेत.

जैतापकर यांचा शिवसेनेत प्रवेश हा विशेषतः असगोली जिल्हा परिषद गटासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यात शिवसेना आणि मित्रपक्ष भाजप यांच्यातील राजकीय तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आणि कार्यकर्त्यांनी जैतापकर यांचे स्वागत केल्याने या प्रवेशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत असगोली गटातील उमेदवारांच्या दावेदारीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव, जे शिवसेना (उध्दव बालासाहेब ठाकरे) चे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, यांनी असगोली जिल्हा परिषद गटातून शिव सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून निवडणूक लढ़वत असून त्यांच्या विरुद्ध, जैतापकर यांचे निवडणूक लढविण्याचे संकेत मिळत असल्याने, दोन्ही गटांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. आणी निवडणुकीत कडवी लढाई होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत जैतापकर यांचा प्रवेश झाल्यामुळे असगोली गटातले राजकीय समीकरणे बदलले आहेत. या प्रवेशामुळे शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामध्ये, काही इच्छुक उमेदवारांच्या नाराजीमुळे या गटात राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच जैतापकरांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यांचा प्रभाव या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात नेतृत्वासाठी मोठी लढाई होणार आहे. गुहागर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरु आहे. येत्या काही दिवसांत या राजकीय घडामोडींनी गुहागर तालुक्यातील निवडणुकीच्या मैदानावर कसे परिणाम केले जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Total Visitor Counter

3388328
Share This Article