मोतीबिंदू आढळलेल्या नागरिकांचे ऑपरेशन संस्थेच्या वतीने पूर्णपणे मोफत करण्याची सरपंच सौ. नाझिमा बांगी यांनी केली घोषणा
संगमेश्वर : नवनिर्मिती फाउंडेशन, समता फाउंडेशन, ग्रामपंचायत कुरधुंडा आणि जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कुरधुंडा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात विविध नेत्ररोग, दृष्टीदोष, तसेच मोतीबिंदूची तपासणी करण्यात आली. अनेक नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला. शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे मोतीबिंदू आढळलेल्या नागरिकांचे ऑपरेशन संस्थेच्या वतीने पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामपंचायत सरपंच सौ. नाझिमा बांगी यांनी केली.
यावेळी नवनिर्मिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज, संघटनेचे कार्याध्यक्ष जमुरत अलजी, सरपंच नाझिमा बांगी, उपसरपंच तैमूर अलजी, तंटामुक्ती अध्यक्ष इरफान नवरेकर, नेत्रचिकित्सक संकेत पाटील,समता फाउंडेशनचे नितेश शेटे, ग्रामपंचायत सदस्य संगीता लिंगायत,ग्रामसेवक श्रेया भायजे, संदेश निघावले, सुधीर खापरे, दिप्ती डावल, उमर अलजी,कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले.
स्थानिक नागरिकांनी अशा सुविधापूर्ण शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजक संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.






